पंढरपूरची वारी
पंढरपूरचा वारी सोहळा हे जसे महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे; तसेच ते भक्तितत्त्वाच्या सामाजिकतेचे लोकवैभवही आहे. वारी म्हणजे भक्तीचे सामाजिकीकरण. संपूर्ण वारी सोहळा हा पंढरपूरचा श्रीविठ्ठल आणि विठ्ठलभक्त याच्या भोवती गुंफला गेला आहे.
पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. सकल संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर म्हटले आणि पंढरीला माहेर म्हटले. माझे माहेर पंढरी असे म्हणत पंढरीविषयी जीवनाचे एक नाते प्रस्थापित केले.
वारीचे छोटे छोटे भाग आहेत त्यांना दिंडी म्हणतात
ह्या सर्व दिंडी गावागावातून निघून पुढं वारीला मिळतात.
मी लहान असताना माझ्या गावाच्या रस्त्याने एक दिंडी जायची ती पुढे जाऊन ह्या मुख्य वारीला सामील होत असावी ,
त्या वेळेस दिंडी येण्याच्या दोन तीन दिवसापूर्वीच गावात दिंडी वा त्यांच्या स्वागता विषयीची चर्चा व्हायची.
ठरलेल्या दिवशी दिंडी गावात यायची सर्व गावकरी त्यांच्या चहा ,जेवणाची व्यवस्था करत कुठलंही मॅनेजमेंट नाही तरीही ह्या गोष्टी अत्यंत सुंदर रित्या पार पडत , इतक्या सर्व लोकांना एकत्र पाहणे त्यातही त्या टाळ- मुर्दुंग गचा आवाज जणू आम्हसाठी एक उत्सवच वाटायचा
आम्हीही आमच्या परीने पाणी मीठ वाढून ह्यात सक्रिय सहभाग नोंदवायचो .
ह्या दिंडीत कुठंही कोणाचा मोठेपणा नाही ना छोटेपणा सर्व एकमेकांना फक्त माऊली माऊली म्हणत सर्व परिसर माऊलीमय करून टाकायचे
मग तो लहान मुलगा असो त्यालाही माऊली
आणि मोठे असो त्यालाही माऊली
जेवण व थोडा आराम झाला की पुन्हा भजन कीर्तन करत हे सर्व दिंडी पुढच्या मार्गासाठी मार्गस्थ व्यायची,
खूप छान वाटायचा तो दिवस आणि तेव्हापासून वारी बद्दल असलेली उत्सुकता व आकर्षण कायम आहे..
वारीमध्ये भजनाबरोबरच भारूड, संकीर्तन, धाव, फुगडी आहे. या वाटचालीला एक संत खेळाचे रूप दिले आहे. काही उभी रिंगण केली जातात. रिंगण म्हणजे एक वर्तुळ. जीवनाच्या कोणत्याही क्षणापासून जीवरूप बिंदूपासून निघायचे आणि व्यापक शिवरूपाला वळसा घालून पुन्हा जीवरूप अवस्थेच्या बिंदूपाशी जायचे. त्यातून जीवनाचे रिंगण पूर्ण होते.
महाराष्ट्रातील लाखो वारकरी भक्तांना प्रापंचिक दुःखा मधून काही काळापुरता का होईना पण बाहेर काढून देहभान विसरायला लावण्याचे ताकद वारीत नक्कीच आहे .
पंढरपूरच्या वारीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस , लंडन ने ही घेतली आहे
"एकाच ठिकाणी सर्वात जास्त लोक येण्याचे ठिकाण " असे वर्णन नोंदवले आहे
धन्यवाद ☺️
शक्य असल्यास अभिप्राय नक्की कळवा
सुजित पांडुरंग पाटील
फोटो - गूगल
MAST
ReplyDeleteMast
ReplyDeleteखूप छान 👌🏻😍
ReplyDelete