चीन व चिनी वस्तूंवर बंदी........
#चीन व चिनी वस्तूंवर बंदी........
काही दिवसापूर्वी चीनने लडाख भूमी वरील भारतीय जमीन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला त्यात आपल्या शूर सैनिकांनी त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला
त्यात आपल्या 20 शुर जवानांना वीरमरण आल
ही माहिती आपण बातम्यां द्वारे ऐकत असालच.
ह्या घटनेपासून भारतात सर्वी कडे चीन चा विरोध सुरू झाला व त्यात लगेच चीनी वस्तूवर बहिष्कार
ह्या बातम्या वा माहिती फिरू लागली
त्यावर हे विचार..
"चिनी वस्तूंवर बंदी."
बंद हा शब्द साऱ्यांच्या जिव्हाळ्याचा. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 'नोटबंदी', करोनाला पळवण्यासाठी 'देश बंदी', आणि आता चीनला धडा शिकवण्यासाठी 'चिनी वस्तू बंदी'. चीनला धडा शिकवायला निघालोय आपण स्वतः इतिहासातून काही धडे घेणार का?
पावसात मुंबईची तुंबई होते. यामागील कारणे आता सर्वश्रुत आहेत. काही महिन्यांपूर्वी प्लास्टिक पिशवी बंदी लागू करण्यात आली होती. आता काय झालं त्याचं?
मोबाइल फोडणे, टीव्ही जाळणे अशाने ना त्या शाहिद जवानांच्या आत्म्यास शांती लाभणार, ना चीनला फारसा फरक पडणार.
असल्या बातम्या तिथल्या मीडिया मध्ये देखील झळकत नाहीत.
चिनी वस्तूंची होळी करून त्याचे व्हिडीओ काढणाऱ्या निम्म्याहून अधिकांचे मोबाईल 'मेड इन चायना' असतील किंवा त्या मोबाईल साठी लागणारे निम्मे साहित्य चिनी बनावटीचे असेल. चिनी वस्तूंचा त्याग आपण आधीच करणे आवश्यक होते.
तसे प्रयत्न देखील झाले, पण सारेच फसले. त्यातून आपण काय शिकलो?
चिनी वस्तू तोडण्या आधी किमान भारतीय वस्तू जोडा तरी. पण बंदी सारखा सोपा (चांगला नाही) मार्ग सोबत असताना आपण इतर मार्गांचा विचार करू कशासाठी!
देश सर्वांना प्रिय असतो हो. प्रत्येकाच्या मनात देशभक्ती असायला हवी.
पण ती हंगामी नसावी. सध्या जी देशभक्ती जागी झालीये ती देखील अशीच हंगामी आहे. जर ही देशभक्ती चिरकाल टिकायाल हवी, असे वाटत असेल. तर त्यासाठी सोपा नाही थोडासा कठीण मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. जर ते जमणार असेल तर आणि तरच 'बंदी'चा मार्ग स्वीकारा.
सोपा मार्ग कठीण यातना देतो हा इतिहास आहे. पुन्हा पुन्हा दाखले देण्यात हशील नाही. अंध कार्यकर्ते, बिकाऊ मीडिया आणि विवेकास विराम देणारी जनता यांना यातून बाहेर काढावे लागेल. तेव्हा चीनला खराखुरा धडा शिकवण्यास आपण पात्र होऊ.
आता 'कठीण मार्ग म्हणजे काय?' हे मार्ग मी वेगळं सांगायला नको.
कठीण मार्ग हाच की ज्या वस्तू भारतीय बाजारपेठेत आहे भारतीय आहेत त्यांना प्रोत्साहन द्या...
निदान शक्य तितकं आपल्या देशातील सामान वापरायला घ्या...
व भारतीय व्यावसायिक लोकांनाही भारतीय मालाची गुणवत्ता व बाजारपेठ कशी वाढेल याकडे लक्ष देणे व त्यावर सतत काम करत राहणे गरजेचे आहे
कारण चीनचे हे बाजारपेठ ही काही दिवसातच तयार नाही झाले त्यालाही खूप कालावधी लागला
आपल्यालाही त्यासाठी खूप वेळ लागू शकतो हेहीआपण लक्षात घेऊन काम करावं लागेल.
शेवटी एकच आपण काय घ्यावं व काय नाही हे आपलाच अधिकार आहे.
"कुठलीही गोष्ट सुरवातीला अशक्य व कठीणच वाटते तसाच चिनी मालावर बहिष्कार ही गोष्ट तितकी कठीण जरी वाटत असली तरी मात्र अशक्य नाही. "
धन्यवाद..☺️🙏🇮🇳
शक्य असल्यास अभिप्राय कळवा
लेखक - कार्तिक जाधव

सुजित पांडुरंग पाटील . 🙏
Chhan
ReplyDeleteThanks dada
Deleteछान सुजित.. अगदी थोडक्यात आणि महत्वपूर्ण लेख लिहिला आहेस..👌💯
ReplyDeleteThanks
Deleteउत्तम लेख पण खरंच चीन मधून येणाऱ्या माळावर बहिष्कार केला तर त्याला त्या किमतीचे विकल्प सध्या तरी आहेत का हा पण संशोधनाचा विषय आहे.
ReplyDeleteसहमत..
DeleteLekh kharach vichar karyla laavnara ahe...nemke mat mandley
ReplyDeleteMst sujit..Agdi satya vishayavrr lekh lihila ahes.
ReplyDelete