एक प्रवास - दुबई


                • एक प्रवास - दुबई



        एकूणच भारतात परदेश म्हटलं की काही देश चटकन आठवतात ,
त्यातलच एक शहर "दुबई"
आपल्या भारतात लोकांच्या आवडीच्या शहरांपैकी एक आवडीच शहर...

" चिट्टी आई हैं आई हैं ,
    चिट्टी आई हैं  " ( नाम - सिनेमा )
हे गाणं पण अश्याच शहरातून गायलं गेलं
सिनेमात तेव्हापासून
ह्या देशाबद्दल अधिकच भावनिक जवळीक निर्माण झाली आपली....
जगात बऱ्याच गोष्टी पर्यटनासाठी बनवलेल्या असतात तश्या दुबईतील अश्या काही सुंदर कलाकृती आहेत महत्वाचं म्हणजे दुबई चा पर्यटनातून मिळणारा नफा यांच्या इतर उत्तपंनातून खूप अधिक आहे
दुबई असल्याने अश्या काही लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्याचा योग आला त्या सर्व स्थळांची व दुबई ची अनुभवपर माहिती देण्याचा हा छोटासा प्रयत्न...

दुबई शहर हे संयुक्त अरब अमीरात ह्या देशातील सात शहरांपैकी एक लोकप्रिय शहर आहे.
दुबई शहर हे जगातील सर्वात लोकप्रिय शहरांपैकी एक आहे आहे. इथे लोकांचा पोशाख सुद्धा वेगळा आहे. दुबई मध्ये १५ % फक्त निवासी लोक राहतात आणि बाकीचे लोक अन्य देशातून इथे आले आहेत.
दुबईची बोल भाषा अरबी आहे परंतु भारतीय लोक जास्त असल्याने हिंदी भाषा ही मोठ्या प्रमाणात वापरली जाते.


दुबई






     वाकडी तिकडी बिल्डिंग नाव माहीत नाही 😀





दुबई मधील सर्वात मोठे आकर्षण केंद्र म्हणजे १६३ मजली बुर्ज खलिफा आहे.
इथल्या वाळू वर उभे असलेले मोठ्या मोठ्या उंचीच्या व वेगवेगळ्या रचनेच्या बिल्डिंग
आर्कीटेक्चर चे अदभुत नमुने आहेत.

बुर्ज -खलिफा - TALLEST MAN-MADE STRUCTURE IN THE WORLD

उंची ८२८ मीटर, २०० वर अधिक मजले.
बुर्ज खलिफाच्या १२४व्या मजल्यापर्यंत लिफ्ट जाते  तेही अवघ्या  १ मिनिटात. लिफ्ट मध्ये १ ते ६० सेकंद मोजेपर्यंत १२४व्या मजल्यावर लिफ्ट कधी पोहोचते ते समजतही नाही. कानात मात्र,  विमानात असताना जसे जाम झाल्यासारखे वाटते ना,    तसे वाटले क्षणभर.  
 १२४ व्या मजल्यावर पोहोचल्यावर   वाटलं,  काय विमानातूनही दिसते तसेच खालचे चित्र दिसत असेल. पण जमिनीवर राहून "Top of the world from the Land" पाहण्याची मजा काही औरच...

वरतून दिसणारे दुबई शहराचे दर्शन खरोखरच मनात साठून राहते.









    
दुबईचा राज्यकर्ता. शेख महम्मद बिन राशीद अल मक्तूम आणि त्याने वर  लिहिलेले मस्त quote

"The word impossible is not in the leader's dictionaries
No matter how big the challenges, strong faith, determination
and resolve will overcome them."

ह्या बुर्ज खलिफा समोरच डान्सिंग कारंजे आहे ,
ते कारंजे वेगवेगळ्या देशी विदेशी गाण्यांवर डान्स करतात हा शो रोज संध्याकाळी होत असतो...








  

बुर्ज अल-अरब

बुर्ज-अल-अरब हे   दुबईतील ७-स्टार हॉटेल आहे. याला ७० मजले असून,   २००९ पर्यंत जगातील सर्वात उंच हॉटेल होते. आता ते जगातील चौथ्या क्रमांकावर आहे त्याचा आकार जहाजाच्या शिडासारखा आहे.. जुमेरा बिच पासून  २८० मीटर अंतरावर  कृत्रिम बेटावर हे हॉटेल   वसवलेले आहे.   निळा रंग मध्ये-मध्ये असलेली हॉटेलची हि पांढरी-शुभ्र अवाढव्य   इमारत बघून खरेच प्रसन्न वाटेल. बाजूलाच वाडी पार्क नावाचे water  park आहे. इथेही विदेशी लोकांची खूपच गर्दी दिसते.





हॉटेल अटलांटिस 

हे आहे पाम जुमेरा नामक कृत्रिम बेटाचे  एक चित्ताकर्षक  दृश्य. पाम जुमेरा हे एक  पाम झाडाच्या आकाराप्रमाणे  पाण्यात तयार केलेले एक बेट . त्याला १६ फांद्या असून त्यावर व्हिलास वसवले आहेत. गोल दिसणारा क्रिसेंट आणि त्याच्या टोकाशी अटलांटिस हॉटेल.  पाम  जुमेराचा हा  वरतून दिसणारा view .

    पाम जुमेराच्या शेवटच्या टोकाला अटलांटिस  हॉटेल आहे. एका बाजूला अटलांटिसची  भव्य-दिव्य लखलखती  इमारत आणि दुसऱ्या बाजूला मोठ्यामोठ्या दगडांच्या पलीकडे पसरलेला अथांग समुद्र . 




असे अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळ अजुन आहेत दुबईत अजुन त्या ठिकाणी भेट द्यायची बाकी आहे म्हणून त्या स्थळांची माहिती नंतर कधीतरी देण्याच्या प्रयत्न करेल... आपल्याला दुबईत मी अनुभवलेली बघितलेली स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न कसा वाटला नक्की कळवा..



धन्यवाद , 🙏
पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू

Sujit Pandurang Patil

Photo Courtesy - (मी व Google)



Comments

  1. त्या वाकड्या तिकड्या बिल्डिंग ला cayan tower म्हणतात. ��

    ReplyDelete
  2. Nice... It's Very Informative.

    ReplyDelete
  3. भावा तू लिहतोस आपल्या मायबोलीमध्ये बस आम्हाला गर्व वाटतो
    जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  4. Weldone sujit baslya baslya Dubai Darshan zale

    ReplyDelete
  5. एकदम भारी कडक

    ReplyDelete
  6. Khupi chan info...agadi ghari basun sagle baghitlya sarkhe vatle... details mast ahet👌

    ReplyDelete
  7. Nice, Missing Dubai, Lovely place, nicely described in your article. Keep writing

    ReplyDelete
  8. दुबई बद्दल उत्तम माहिती सांगणारा लेख.नक्की वाचावा असा लेख.

    ReplyDelete
  9. Job hava asel dubai madhe tr kas try karayach Mumbai madhun

    ReplyDelete
  10. Dubaich cluture rahil ki ...bakiche je rahile te next blog madhe series kar

    ReplyDelete
  11. Sujit nice writing dubai city world best tourism👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय गुप्तचर संस्था -RAW

स्वातंत्र्यदिन ....