गाव - बदलत बघतांना
गावं..
लहानपणी शहराची प्रचंड ओढ होती कारण तेव्हा शहर काय असतं ते कधी पाहिलंच नव्हतं , ऐकलं होतं फक्त शहरातील गावाकडे येणार्या नोकरदार मंडळींकडून तो त्यांचा रुबाब ,त्यांच्या शहराविषयीच्या कथा पण आज शहरात आल्यावर कळते गाव काय असत ते.
गावात गेलेला वेळ हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव असतो त्याला मी कसा अपवाद असणार.
गावाकडची प्रत्येक गोष्ट सांगावी वाटते त्या गावाकडच्या आठवणी असतातच आपल्यात कायम खास करून परदेशातून गावाकडे बघतांना खूप गोष्टी नव्याने वाटू लागतात.
पण अचानक मला प्रश्न पडतो की लिहायचं तर गावा बाबतच का ? शहराबाबत का नाही ? मग हळूच लक्षात येतं बर्गर आणि पिझ्झा आपल्याला पचवण्याचा विषय होऊ शकला नाही तर सुचण्याचा कसा होऊ शकेल .
गाव म्हटलं की पक्ष्यांच्या किलबिलाटात झाडेझुडपे खेळण्यासाठी भरपूर आणि मोकळी जागा हा विषय वेगळा परंतु गावातही आता पक्षांची जास्त वावर नाही मुलंही मोबाईलमध्ये गुंतलेले व शहरातच गावा पेक्षा जास्त झाडी आहेत असं वाटू लागलय.
शहरातल्या लोकांना गाव म्हटलं म्हणजे नदी , सैराट च्या पिक्चरसारखी सारखी विहीर असं वाटू लागतं परंतु बऱ्याच गावात काही मित्रांच बालपण टँकरच्या मागे धावण्यात , लाईन मध्ये उभे राहण्यात गेलेलं असतं ही पण वस्तुस्थिती आहे.
मुंबईसारख्या शहरात पूर , बॉम्बस्फोट सारखी एखादी घटना घडते तेव्हा सर्व लोक एकमेकांच्या मदतीला धावून येतात याला सर्व जगभर मुंबई स्पिरीट म्हणतात परंतु संकट आले की लोकांसाठी धावून जाणं हे आपण गावात शिकलेलो असतो.
आताच्या शहराच्या प्रदूषणाकडे पाहून गावाचे ते रम्य वातावरण माणसाला गावाकडे आकर्षित करत असते .
माझे गाव पण सर्वसाधारण गावासारखे छोटेसे पण आत्मनिर्भर असलेले , गावातून एक नदी जाते आणि नदीवरील छोटेसे धरण नदीच्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा तो मंजुळ ध्वनी अजूनही कानात ऐकू येतो , जेव्हाही समुद्रात वा समुद्रापाशी लाटांचे आवाज येतात तेव्हा गावाच्या नदीची आठवण येऊन जाते.
गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेतीशी निगडित होते. गावात मुख्य एका जातीचे प्राबल्य होतं तरी पण इतर सर्व जातीच्या लोकांना बरोबर घेऊन चालायची लोकांची प्रवृत्ती होती , त्यामुळे आमच्या गावात संघर्ष असा नव्हताच पोलीस स्टेशनला केस गेलेली कधी लक्षात ही नाही , गावातले तंटे गावातच सोडवले जात होते त्यावेळी वडीलधारी लोकांचा मान होता , सर्व गावकरी गावातील ज्येष्ठांचा मान राखत होते त्यावेळी नदीला पाणी मुबलक असल्याने शेतीत पण उत्पन्न चांगल्या प्रमाणात येत होतं पण पाण्याच्या वापरा विषयी लोकांमध्ये काही जागृती नव्हती.
जसजसा काळ बदलत गेला पाऊस कमी पडायला लागल्यावर नदीला पण पाणी कमी झाले व जिथे वर्षात तीन पिके घेणाऱ्या गाव आता फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून झालं शेतीत उत्पन्न कमी झाल्याने लोकांना रोजगाराच्या शोधासाठी शहराकडे जावे लागतय.
गाव म्हटलं तर गणपती उत्सव कानबाई गाव देवी उत्सव आठवतात त्यात जमलेले शहरी बांधव मिळून केलेले सर्व कार्यक्रम व आलेली एकुणच धमाल आठवते , आखाजी आणि दिवाळीची एक वेगळीच मज्जा असते तेही गावातच कळते.
परंतु आता गावही बदलत चाललंय गावात आता हेवेदावे सुरू झालेत , निवडणूक अधिक ईर्षेने होऊ लागल्यात . कधी पोलीस स्टेशनचे तोंड न पाहणारे गाव आता केसेस करू लागलेत. गावातील शांततेत थोडासा फरक पडलाय , गावातील चुल्ल्यांच्या जागा आता गॅस ने घेतलेली आहे , कुरडई पापड पण आता बाजारात खरेदी करायला सुरुवात झाली आहे , गावातले लोकही शहराकडे धाव व स्थलांतर करू लागलेत , मुलंही आता मराठी शाळेत कमी झालेले दिसत आहेत व मैदानी खेळ सोडून मोबाईल मध्ये गुंतलेले अधिक दिसताय.
परंतु आशादायक बाब अशी आहे की गावातले तरुण आता प्रयत्नांची पराकाष्टा करून मोठी स्वप्न साकार करू लागले , नवीन गोष्टी शिकू लागली , शेतीचे आधुनिकीकरण सुरू झाले , पाण्याची महती आता कळू लागलीय , स्पर्धा परीक्षेत गावातला टक्का वाढायला लागलाय.
गावात पण आता जीवनाच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होऊ लागलीय , सरकारच्या धोरणांवर तर नेहमीच चर्चा व्हायची आता शेती व शेती संदर्भातील धोरणांवर चर्चा होऊ लागली , गावातले तरुण आता मोबाईल द्वारे जगाला कनेक्ट होऊ लागलेत व सर्व चांगल्या गोष्टी माहिती या जीवनात उतरवू लागले .
थोडक्यात गावाचे बरेच प्रश्न सुटत चाललेत परंतु बेरोजगारी अंधश्रद्धा या विषयांवर अजूनही प्रश्नचिन्ह आहेतच.
शेवटी एवढेच सांगू शकतो लोकांना काळाबरोबर बदल आवश्यक आहेच पण त्याच्याने आपल्या गावाचे गावपण हरवून बसलो.
आणि आता प्रामुख्याने लक्षात आलच असेल की सर्वात सुरक्षित ठिकाण कोणतं असेल आपल्यासाठी तर ते गाव आहे.
धन्यवाद 🙏
आपला अभिप्राय प्रेरणा देणारा असेल नक्कीच कळवा..
Team Classmate.
Author- Sujit And Hemant.

मित्रा लेख का वाचवा तर त्याच उत्तर या ओळीत आहे-
ReplyDeleteलिहायचं तर गावा बाबतच का ? शहराबाबत का नाही ? मग हळूच लक्षात येतं बर्गर आणि पिझ्झा आपल्याला पचवण्याचा विषय होऊ शकला नाही तर सुचण्याचा कसा होऊ शकेल .
खुपच छान
Deleteधन्यवाद 🙏
ReplyDeleteअप्रतिम लिखाण
ReplyDeleteThanks
DeleteVery Nice, Keep it up!
ReplyDeleteThanks Bhai
Deleteसुजित, मला कित्येक दिवसांनी गावाकडे घेऊन जाणारं हे लिहिलं आहेस. प्रदेशात राहणारं पण गावांत अडकलेलं मन खूप छान व्यक्त झालंय.
ReplyDeleteलिहीत रहा.
तुझ्या लिहिण्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल.
शुभेच्छा
संग्राम
ReplyDeleteNice... गावा विषयी ची तुझी आत्मीयता जाणवते.
धन्यवाद भाई
Deleteगावाकडची गोष्टच निराळी आहे
ReplyDeleteहो. Thanks
DeleteSuperb Sujit
ReplyDeleteThanks
DeleteNice memories bhau
ReplyDeleteThanks
Deleteअप्रतिम सुजित...
ReplyDeleteआम्ही गावच्या हाकेच्या अंतरावर असून देखील गावाची आठवड्याभरात हुर गुर होते आजची जागतिक परिस्थिती बघता सर्वांना गावा कडे ची ओढ निर्माण झाली आहे.....
धन्यवाद s
Deleteअप्रतिम
ReplyDeleteThanks
Deleteअप्रतिम 👌👌👌👌
ReplyDeleteThanks
DeleteSujot havachi satya paristhitheche varnan Tu hya lekhanat kelay atishay sunder weldone
ReplyDeleteThanks
DeleteSujot Gavachi satya paristhitheche varnan Tu hya lekhanat kelay atishay sunder weldone
ReplyDeleteThanks dada
DeleteKhup Sundar dada
ReplyDeleteThank You
Deleteअप्रतिम लेख सुजित दादा👍👌👌👌
ReplyDeleteThanks
DeleteSuperb bro👌👌👌👍👍
ReplyDeleteThanks
DeleteThanks
ReplyDeleteआपणा सर्वांचा प्रतिसाद प्रेरणा देऊन गेला.. मनापासून सर्व वाचकांचे धन्यवाद 🙏
ReplyDeleteमस्तच,अजुन गावकडच्या जमती जमती लिहित रहा
ReplyDeleteनक्कीच... Thank You
DeleteBeautiful lines❤
ReplyDeleteU have great writing skills👌
Tujhi shabda rachna khupch sundar ahe...gavat nahi rahile tari vachayla chan vatle...keep it up👍
ReplyDeleteKhup chan Express kel aahe .madani bhashashaili ek no bro .....asech chan blog suchudet tula ...
ReplyDeleteThanks Bro
Deleteखुप सुंदर...
ReplyDeleteउत्तम लेख सुजितदादा....
अगदी प्रत्येक विषयाला शब्दाच्या घेऱ्यात घेऊन उत्तमरित्या समजावुन सांगितले तुम्ही...
emotions behinds the words are beyond the best..
ReplyDeleteभारी 👌👌🙌