लोणार सरोवर

        लोणार सरोवर


पृथ्वीवरील मानवनिर्मित आश्चर्यं खूप आहेत.
अगदी इजिप्तच्या पिरॅमिडपासून भारतातल्या ताजमहालापर्यंत. मानवी बुद्धिमत्तेची भरारी कुठपर्यंत जाऊ शकते, हे यावरून सहज लक्षात येईल. तथापि, निसर्ग हा अद्वितीय आणि कसबी
कारागीर आहे.



मानवी आश्चर्यांपेक्षा निसर्गानं निर्माण केलेली आश्चर्यं, ही अधिक देखणी आणि मानवी मती कुंठित करणारी आहे. अमेरिकेतलं ग्रँड कॅन्यन घ्या
किंवा अॅमेझॉनचं जंगल, गगनाला गवसणी घालणाऱ्या हिमालयापासून अरबस्तानातल्या सर्वव्यापी वाळवंटापर्यंत सर्व काही निसर्गनिर्मित
आहे. .
ही आश्चर्यं अधिक महान आहेत.
अद्वितीय, अद्भुत आणि रहस्यमय, असं ज्याचं वर्णन करता येईल, असं एक निसर्गनिर्मित आश्चर्य भारतात ,तेही महाराष्ट्रात आहे.अग्निजन्य खडकाळ निर्माण झालेल्या जगात दुसऱ्या क्रमांकाचं खाऱ्या पाण्याच सरोवर म्हणजे महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर.
संशोधकांनी केलेल्या सखोल अभ्यासानंतर ते साधारण ५ लाख
७० हजार वर्ष जुने असल्याचं निश्चित करण्यात आलं.सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे.  सरोवराचा व्यास सुमारे१.८ किलोमीटर आहे.
ह्या सरोवराची निर्मिती एक उल्का पृथ्वीला धडकल्याने झाली होती
जगातील नामांकित खऱ्या पाण्याचे सरोवर. इथल्या पाण्याची घनता एवढी की इथे कुणीही बुडत नाही.
ह्या लोणार सरोवरातील  पाणी नेहमीच हिरव असत पण सध्या अचानक गुलाबी रंगाचं झाल आहे ,
हे पाहून सर्व च निसर्ग प्रेमी व अभ्यासक अचंबित झाले आहे...
या पाण्याचा रंग कसा बदलला याचा अभ्यास सुरू आहे.
लोणार सरोवर असेच एक निसर्ग निर्मित सुंदर व वैशि्टयपूर्ण ठिकाण आहे  , त्या दृष्टीने ह्या सुंदर ठिकाणचे जागतिक वारसा म्हणून जतन व संवर्धन करणे सरकार सोबत आपल्या सर्वांची जबाबदारी आहे..
#IncredibleIndia
#BeutyofMaharastra
#लोणार_सरोवर

धन्यवाद ✍️
शक्य असल्यास नक्की अभिप्राय कळवा.

लेखक - सुजित पांडुरंग पाटील

साभार - esakal
फोटो - गूगल

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एक प्रवास - दुबई

गाव - बदलत बघतांना

भारतीय गुप्तचर संस्था -RAW