ब्लॅक टायगर - कथा गुप्तहेरांच्या
ब्लॅक_टायगर
#रवींद्र_कौशिक
#R_A_W
🇮🇳
भारतात एक असा गुप्तहेर झाला आहे की, तो मृत्यूनंतर देशाचा हिरो ठरला. ते गुप्तहेर म्हणजे रवींद्र कौशिक. भारताचे 'ब्लॅक टायगर' म्हणून ते ओळखले जातात.
यांच्या जीवनावर एक हिंदी चित्रपट ही आला आहे ज्यात जॉन अब्राहम यांची भूमिका निभावतो.
#Romeo_Akbar_Walterत्यात त्यांनी कशी महत्वाची महिती भारताला पुरवली याची कल्पना येते.
मुस्लिम बनून पाकिस्तानात दाखल झालेल्या रवींद्र कौशिक यांनी भारतासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. परंतु, दुर्दैवानं त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारला त्यांचं शव स्वीकारण्यासही नकार द्यावा लागला होता. कौशिक हे भारताचे नागरिक नसल्याचं पहिल्यांदा भारत सरकारनं सांगितलं होतं.
त्यावेळी भारत सरकारने कौशिक यांची कामगिरी जाहीर केली नाही. परंतु, नंतर मात्र भारत सरकारनं रवींद्र कौशिक हे भारताचे नागरिक होते, असं जाहीर केलं. रविंद्र कौशिक यांचं काम एका मिशनपुरतं मर्यादीत राहिलं नाही तर ते पाकिस्तानमध्ये राहून पाकिस्तान सेनेच्या मेजर पदापर्यंत जाऊन पोहचले.
पाकिस्तानी सेनेत त्यांनी काही काळ काम केल्यावर त्यांना 'मेजर' या पदावर बढती मिळाली. आपल्यासोबत एक भारतीय गुप्तहेर काम करत असल्याचा मागमूसही एव्हाना पाकिस्तानी सेनेला नव्हता.
खरचं यापेक्षा उत्तम दर्जाची गुप्तहेरी काय असू शकते.
पाकिस्तानमध्ये राहून त्यांनी अनेक माहिती ही भारतापर्यत पुरवत असत.
मात्र, १९८३ हे वर्ष त्यांच्यासाठी फार वाईट ठरले. त्यांना भेटाण्यासाठी 'रॉ'ने एका गुप्तहेराला पाठवलं. परंतु, रवींद्र कौशिक यांना भेटण्याअगोदरच हा गुप्तहेराला पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेनं ताब्यात घेतलं.
त्याची चौकशी केल्यानंतर कौशिक यांची खरी ओळख आणि पाकिस्तानी ओळख समोर आली. याची कुणकुण लागताच अटक होण्याआधीच रवींद्र कौशिक भूमिगत झाले.
अखेर पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीकडून कौशिक यांना अटक करण्यात आली. त्यांना सियालकोटच्या तुरुंगात डांबण्यात आलं.
सियालकोटच्या जेलमध्ये त्यांचा अनेक प्रकारे छळ करण्यात आला. त्यांच्यावर अनेक आरोप लागले. अनेक खटलेदेखील चालवण्यात आले. इतकंच नाही तर, भारतीय सरकारची गुप्त माहिती त्यांनी पाकिस्तानला दिली तर मुक्त करण्याचं प्रलोभनंही त्यांना दाखवण्यात आलं.
मात्र रवींद्र कौशिक यांनी जीवाला धोका असूनही भारताविषयी कुठलीही गुप्त माहिती पाकिस्तानसमोर जाहीर केली नाही.
पाकिस्तानमध्ये १९८५ मध्ये त्यांना फाशी आणि जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली.
२००१ मध्ये रवींद्र कौशिक यांचा तुरुंगाताच मृत्यू झाल्याचं पाकिस्तानने जाहीर केले.
गुप्तहेरांचं आयुष्य म्हणजे रोज टांगती तलवार घेऊन जगणं! केव्हा शत्रूंना आपलं खरं रूप समजेल आणि केव्हा जीव गमवावा लागेल हे काही सांगता येत नाही. तरीही हे गुप्तहेर आपलं काम चोख बजावत असतात.
अश्या हया सर्व भारतमातेच्या वाघांना सलाम 🙌
कोणत्याही स्वार्थाविना केवळ आपल्या जन्मभूमीच्या सेवेसाठी प्राणांचे बलिदान देणारा हा ब्लॅक टायगर आजही विदेशात तैनात असणाऱ्या इतर गुप्तहेरांना निडर होऊन आपले कार्य पार पाडण्याची प्रेरणा देतो आहे.
🇮🇳
#प्रेरणा
साभार - गूगल , वाचलेलं .
फोटो - गूगल
🙏
👌👌👌
ReplyDeleteखूप छान माहिती आहे. - Twitter friend ��
ReplyDelete