Super Women's
Super Women's , संपूर्ण जग व महासत्ता देशातील प्रमुख नेते ह्या कोरोना विरुद्ध लढा देत आहे परंतु तरीही कोरोनाशी लढा देणाऱ्या देशांपैकी जे सात देश अधिक यशस्वी ठरले ,त्या सातही देशांच्या प्रमुखपदी महिला आहेत. जगात व भारतात महिला नेतृत्वाला नेहमी काही अपवाद वगळता दुय्यम स्थान दिलं जात परंतु महिला नेतृत्व काय करू शकते याचा हा पुरावा ह्या नेत्यांनी पुन्हा जगा समोर ठेवला आहे . जवळपास गेले अडीच महिने लॉकडाऊन करूनही, भारतासह जगभरातकोरोनाबाधितांचा आकडा वाढतो आहे. हा विषाणू आणि आणि हा आजार नवा असल्याने, त्याच्याशी सामना करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धतीही वेगळ्या आहेत पण, एक गोष्ट या जागतिक लढ्यामध्ये ठळकपणे जाणवली ती म्हणजे,कोरोनाशी लढण्यात जे सात देश यशस्वी ठरले, त्या सातही देशांच्या प्रमुखपदी महिला आहेत.हे सात देश आहेत – जर्मनी, तैवान, नॉर्वे, फिनलंड,न्युझीलंड, डेन्मार्क आणि आईसलंड. 1. न्युझीलंड च्या पंतप्रधान " जेंसीफा आर्डन " 2. जर्मनीच्या चान्सलर "अँगेला मर्केल " 3. फिनलंडच्या पंतप्रधान "सना मारीन" ...