शेती व पाऊस

तब्बल एक महिना झाला होता पेरणीला आणि तरी
मेघराज्यांन त्याच दर्शन आम्हाला दिलेलं नव्हत यायचा कधीतरी चार - पाच दिवसांनी आणि जाणीव करून जायचा की माझा वेळ आहे हा.पण ते आम्हा शेतकऱ्यांना पुरेसन नव्हत पीक सुखावत होती आणि त्याच बरोबर आमची मन ही सुखावत होती.
पहिलेच करोनाच संकट त्यावर मेघराज्याच आमच्यावर रुसून बसन आम्हास अस य्य करत
होते तसे तर आम्हाकडे संकटांचे सधा ओझेच असते पहिली अडचण तर आमच्या कडे पेरणीला बियाण्याची कमी होती
त्यात या लॉकडाऊन मुळे बोगस बियाण्याची भीती मनात घर करत होती .मोठ्या कळजाने पेरणी केली पण मेघज्याचे

दर्शन नाहीत.पण आज मेघराज्याने आम्हाला दर्शन
दिले..जणू लहान बाळाला चॉकलेट दिल्यावर तो आनंदित  होतो त्याप्रमाणे आम्हाला किवा त्याहूनही अधिक आनंद आम्हाला होत आहे काही शनापूर्वी मन अशी उदास वाणी निरागस झाली होती पण जसे मेघराज्याचे आगमन झाले मन भरून आले लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व त्या
मेघराज्याच्या सारीकडे जणू असे पाहत राहिले की देव आम्हाला अमृत्व देत आहे काही तर मेघज्याच्या आगमनाने नाचू लागले खरच अप्रतिम हा क्षण पाहिल्यावर डोळ्यात पाणी आले तब्बल एक तास त्या मेघराज्याच्य सरीकडे पाहून मला खरच मेघराज्याचे शेतकऱ्याच्या जीवनातील
महत्व आता मला कडलेले आहे . कितीही हायटेक शेती केली तरी त्यात मेघराजाशिवाय पर्याय नाही..

धन्यवाद
शक्य असेल तर अभिप्राय नक्की कळवा .
लेखक - तुषार जितेंद्र पाटील.

Comments

Popular posts from this blog

एक प्रवास - दुबई

गाव - बदलत बघतांना

भारतीय गुप्तचर संस्था -RAW