माझी शाळा आणि शिक्षण प्रणाली

   माझी शाळा आणि शिक्षण प्रणाली


अतिशय आनंद होत आहे की आज माझ्या शाळेविषयी काहितरी लिहितोय,आणि तितकेच वाईट वाटेल शिक्षण प्रणाली विषयी लिहितांना .......
शाळेत अंगिकारलेल्या चांगल्या सवयी आणि त्याचासोबत काही चांगल्या गोष्टीही सामोर येतील अस मला वाटते.
 मी मुळचा दहिगाव संत या गावाचा माझं गाव खुप सुंदर आहे कारण तिथे निसर्गाने अल्लोकीक नैसर्गिक
सौंदर्य प्रदान केलय, आणि त्याच वातावरणात माझी चिमुकली पण कर्माने तेजस्वी शाळा अभिमानाने ऊभी आहे ...
शाळा म्हटली तर स्वछंदी जगन, नाही कालची पर्वा ,नाही उद्याची काळजी फक्त वर्तमानात आपल्याच धुंदीत मजा करण...
अगदी अभ्यास सुद्धा मजेत करण ...
हो खुप सुंदर होते ते दिवस,खेळणं,मजा मस्ती ,मस्करी ही चालायची कारण हेच तर वय असत ह्या सर्व गोष्टी करण्याचे. त्यासोबत व्यक्तिमत्व विकसाकडे लक्ष असणंं, घरी येऊन (Home Work ) न केल्याशिवाय बाहेर मित्रांसोंबत खेळायला जावयास नाही मिळायचे ह्या सगळ्या गोष्टी अशा शिस्तबद्द पद्धतशीर चालयच्या.



हे सार आजपासुन जवळपास आठ दहा वर्षापूर्वीचे जीवन ...पण आता Digital Global Worldअशा छान technology's आल्या आहेत .पण त्याचा उपयोग शिक्षणासाठी न होता social media साठी होतो. कदाचित खाजगी शाळा मध्ये तो होत असावा.
आपल्या ग्रामीण भागातील शाळांची अवस्था फार बिकट आहे कारण ....."मुलांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या जास्त आहे" हो पण शिक्षण अधिकारी येत असता गावातली मुले ज्याची शिक्षण घेण्याची ऐपत नसलेली असे मुलं गोळा करून पटावरील संख्या बरोबर करण्यात कोणते शहाणपण...
पण त्याच मुलांना स्वखर्चाने आपलं समजून शिक्षण देणारे फार कमी आहेत...मला अजुन एकही शिक्षक असे नाही दिसले की ते शिकवत असलेल्या शाळेत आपल्या मुलांना शिकवतील ...का इतकी वाईट आहे तुमची शिकवणी ? कदाचित तसे नसेलही मग शिकवा त्याना आपल्या शाळेत आणि बदला सगळे चित्र...कुणीही सहजच बोलून जात की आपली शिक्षण प्रणाली चुकीची आहे पण आपण आपली ड्यूटी नीट करतो का याचा विचार व्हायला हवा. फि वाढल्या,पगार वाढले पण शिक्षणाची पातळी मात्र खालावली.....

आपली शिक्षण प्रणाली कशी चुकिची आहे यासाठी आपण जरा मागे जाऊ म्हणजे इंग्रजी लोक आपल्या देशात आली .....तेव्हा
इंग्लिश एज्युकेशन Act 1835 Council of हा भारतीय परिषदेचा वैधानिक कायदा होता, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1by35 in मध्ये घेतलेल्या निर्णयाला प्रभावीपणे ठरवून दिलेला निधी ब्रिटिश संसदेने खर्च करावा लागला. भारतातील शिक्षण आणि साहित्य यावर त्यांनी मुस्लिम आणि हिंदू शिक्षणाची परंपरा आणि मूळ भाषा शिकल्या जाणार्‍या निरनिराळ्या भाषांमध्ये साहित्य प्रकाशित करण्यास पाठिंबा दर्शविला नव्हता (संस्कृत भाषा; पुढे ते इंग्रजीसह पाश्चात्य अभ्यासक्रम establish्या आस्थापनांना इंग्रजी शिकवण्याची भाषा म्हणून पाठिंबा देणार होते. प्रशासनाची भाषा आणि उच्च न्यायालयांची भाषा, यामुळे परदेशी राज्यकर्त्यांची मूळ भाषा न ठेवता इंग्रजी भारताची भाषा बनली...
(विशेषत: हिंदू) संस्कृती आणि शिक्षण यांच्या निकृष्टतेवर दडपण आणत होते. त्यांनी असा युक्तिवाद केला की पाश्चात्य शिक्षण श्रेष्ठ आहे आणि सध्या ते फक्त इंग्रजी माध्यमातून शिकवले जाऊ शकते. म्हणून इंग्रजी भाषेच्या उच्च शिक्षणाद्वारे - "एक व्यक्ती, रक्त आणि रंगात भारतीय, परंतु इंग्रजी चव, मते, नैतिकता आणि बुद्धीने" अशा भाषेची निर्मिती करण्याची गरज होती जे त्यांच्या वळणावर साधने विकसित करु शकले.
यात आपल्याला स्पष्ट जाले असेल की भारतीय शिक्षण प्रणालीच श्रेष्ठ आहे.माझा देश हा विविधतापूर्ण आहे.विविधतेने नटलेल्या या देशात अनेक धर्म, संस्कृती जगात विविधतेत ऐकता अशी महान ओळख करून देतात.कदाचित आपल्याला याचा विसर पडला असावा....


 कुटे जातोय आपण, लाखो मुल बेरोजगार झालेत Unemployment Rate हा 9.21पर्यंत पोहचला... ऐकिकड आपण प्रगती पथावर आहोत अस वाटत पण दुसरीकडे जगाच्या तुलनेत आपण फार मागे आहोत अस वाटायला लागत ...याचा विचार तुमच्या माज़्या सारख्याने करायचा नाही तर कोन करनार...? निव्वळ भाष्य करून आणि विदेशी अनुकरण करून प्रगती झाली असती तर ती ऐव्हाणा कधीच झाली असती नाही का..?
जागतिक महासत्ता होण्याची स्वप्न पाहणाऱ्या आपल्या देशात ह्या सर्व गोष्टींवर तितका विचार होतांना दिसत नाहीये ही निराशाजनक बाब आहे

धन्यवाद  🙏

ब्लॉग लिहिण्याचा पहिला प्रयत्न , बघा कसा वाटला
शक्य असेल तर अभिप्राय नक्की कळवा .

लेखक : इंजि.यशोदीप हिम्मत पाटील.
फोटो - गूगल

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एक प्रवास - दुबई

गाव - बदलत बघतांना

भारतीय गुप्तचर संस्था -RAW