पंढरपूरची वारी
पंढरपूरचा वारी सोहळा हे जसे महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे; तसेच ते भक्तितत्त्वाच्या सामाजिकतेचे लोकवैभवही आहे. वारी म्हणजे भक्तीचे सामाजिकीकरण. संपूर्ण वारी सोहळा हा पंढरपूरचा श्रीविठ्ठल आणि विठ्ठलभक्त याच्या भोवती गुंफला गेला आहे. पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. सकल संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर म्हटले आणि पंढरीला माहेर म्हटले. माझे माहेर पंढरी असे म्हणत पंढरीविषयी जीवनाचे एक नाते प्रस्थापित केले. वारीचे छोटे छोटे भाग आहेत त्यांना दिंडी म्हणतात ह्या सर्व दिंडी गावागावातून निघून पुढं वारीला मिळतात. मी लहान असताना माझ्या गावाच्या रस्त्याने एक दिंडी जायची ती पुढे जाऊन ह्या मुख्य वारीला सामील होत असावी , त्या वेळेस दिंडी येण्याच्या दोन तीन दिवसापूर्वीच गावात दिंडी वा त्यांच्या स्वागता विषयीची चर्चा व्हायची. ठरलेल्या दिवशी दिंडी गावात यायची सर्व गावकरी त्यांच्या चहा ,जेवणाची व्यवस्था करत कुठलंही मॅनेजमेंट नाही तरीही ह्या गोष्टी अत्यंत सुंदर रित्या पार पडत , इतक्या सर्व लोकांना एकत्र पाहणे त्यातही त्या टाळ- मु