स्वातंत्र्यदिन ....
७४ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ही शपथ घेवून स्वंतत्र भारताचा नवा अध्याय सुरु झाला होता… या प्रवासात आपण कोठुन कुठपर्यंत आलोय याच सिंहावलोकन करण्याचा हा छोटासा प्रयत्न.. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पारतंत्र्याच्या काळ्याकुट्ट पडद्याला बाजूला सारून स्वतंत्र्याचा सोहळा रंगमंचावर मांडण्यात आला. सूत्रसंचालकाची भूमिका पंतप्रधान पंडित नेहरू यांनी चोखपणे निभावली..”अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता..” या अजरामर आणि ऐतिहासिक भाषणातून नेहरूंनी देशाला स्वबळावर भरारी घेण्याचे स्वप्न दिले. मात्र हा प्रसंग साकार होण्यासाठी सहशत्रवधी स्वातंत्र्यसैनिकांना आपल्या आयुष्याचा होम करावा लागला..कित्येकांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली, काहींना तोफेच्या तोंडी दिले गेले, अनेकांना अन्न पाण्याविना तडफडून मरावे लागले, तर काहींना ऐन तारुण्यात फासावर जावे लागले. जहाल आणि मवाळ अशा दोन्ही माध्यमांचा वापर करत, अनंत हालअपेष्टा सहन करून सुमारे दीडशे वर्षांच्या लढ्यानंतर भारतीयांनी ब्रिटिशाना देशातून हुसकावून लावले..अन तेंव्हा हे तिरंगी दृश्य साकार झाले. मध्यरात्री १२ च्या ठोक्याला वर्षानुवर