Posts

Showing posts from July, 2020

माझी शाळा आणि शिक्षण प्रणाली

Image
   माझी शाळा आणि शिक्षण प्रणाली अतिशय आनंद होत आहे की आज माझ्या शाळेविषयी काहितरी लिहितोय,आणि तितकेच वाईट वाटेल शिक्षण प्रणाली विषयी लिहितांना ....... शाळेत अंगिकारलेल्या चांगल्या सवयी आणि त्याचासोबत काही चांगल्या गोष्टीही सामोर येतील अस मला वाटते.  मी मुळचा दहिगाव संत या गावाचा माझं गाव खुप सुंदर आहे कारण तिथे निसर्गाने अल्लोकीक नैसर्गिक सौंदर्य प्रदान केलय, आणि त्याच वातावरणात माझी चिमुकली पण कर्माने तेजस्वी शाळा अभिमानाने ऊभी आहे ... शाळा म्हटली तर स्वछंदी जगन, नाही कालची पर्वा ,नाही उद्याची काळजी फक्त वर्तमानात आपल्याच धुंदीत मजा करण... अगदी अभ्यास सुद्धा मजेत करण ... हो खुप सुंदर होते ते दिवस,खेळणं,मजा मस्ती ,मस्करी ही चालायची कारण हेच तर वय असत ह्या सर्व गोष्टी करण्याचे. त्यासोबत व्यक्तिमत्व विकसाकडे लक्ष असणंं, घरी येऊन (Home Work ) न केल्याशिवाय बाहेर मित्रांसोंबत खेळायला जावयास नाही मिळायचे ह्या सगळ्या गोष्टी अशा शिस्तबद्द पद्धतशीर चालयच्या. हे सार आजपासुन जवळपास आठ दहा वर्षापूर्वीचे जीवन ...पण आता Digital Global Worldअशा छान technology's आल्या आहेत .पण

भारतीय गुप्तचर संस्था -RAW

Image
              भारतीय गुप्तचर संस्था -RAW           " Research and Analysis Wing " देशाच्या सुरक्षतेसाठी अनेक जवान त्यांच्या प्राणांचे बळीदान देतात. मात्र एक क्षेत्र असे आहे की, जिथे प्राणांची आहुती देऊनही लोकांपर्यत त्यांचे नावदेखील पोहोचत नाही. ते क्षेत्र म्हणजे भारतीय गुप्तचर क्षेत्र अश्या ह्या क्षेत्राची थोडी माहिती असावी म्हणून हा प्रयत्न.🙏 गुप्तहेर खात्याबद्दल चे हे आकर्षण सर्वसामान्य माणसापासून ते मोठ्या मोठ्या लोकप्रिय मंडळी प्रयन्त सर्वत्र आढळते. आपल्या भारताची गुप्तहेर संघटना RAW (Research And Analysis Wing ) साल 1968 भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी तोपर्यंत भारतात खास हेरगिरीसाठी म्हणून कुठली संस्था अस्तित्वात नव्हती. त्यावेळी अश्या प्रकारचे सर्व काम इंटेलिजन्स ब्युरो बघत होती. शत्रुपक्षाच्या सशक्त आणि कमजोर बाजूची माहितीच भारताकडे पक्की माहिती असावी. म्हणून एकूणच सुरक्षा व्यवस्था आणि शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी एका वेगळ्या संस्थेची गरज इंदिरा गांधींना भासत होती. त्यामुळे इंटेलिजन्स ब्युरोचं विभाजन करून एक वेगळ