Posts

Showing posts from November, 2020

ब्लॅक टायगर - कथा गुप्तहेरांच्या

Image
  ब्लॅक_टायगर  #रवींद्र_कौशिक  #R_A_W 🇮🇳 भारतात एक असा गुप्तहेर झाला आहे की, तो मृत्यूनंतर देशाचा हिरो ठरला. ते गुप्तहेर म्हणजे रवींद्र कौशिक. भारताचे 'ब्लॅक टायगर' म्हणून ते ओळखले जातात. यांच्या जीवनावर एक हिंदी चित्रपट ही आला आहे ज्यात जॉन अब्राहम यांची भूमिका निभावतो. #Romeo_Akbar_Walterत्यात त्यांनी कशी महत्वाची महिती भारताला पुरवली याची कल्पना येते. मुस्लिम बनून पाकिस्तानात दाखल झालेल्या रवींद्र कौशिक यांनी भारतासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. परंतु, दुर्दैवानं त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारला त्यांचं शव स्वीकारण्यासही नकार द्यावा लागला होता. कौशिक हे भारताचे नागरिक नसल्याचं पहिल्यांदा भारत सरकारनं सांगितलं होतं. त्यावेळी भारत सरकारने कौशिक यांची कामगिरी जाहीर केली नाही. परंतु, नंतर मात्र भारत सरकारनं रवींद्र कौशिक हे भारताचे नागरिक होते, असं जाहीर केलं. रविंद्र कौशिक यांचं काम एका मिशनपुरतं मर्यादीत राहिलं नाही तर ते पाकिस्तानमध्ये राहून पाकिस्तान सेनेच्या मेजर पदापर्यंत जाऊन पोहचले. पाकिस्तानी सेनेत त्यांनी काही काळ काम केल्यावर त्यांना 'मेजर' या पदावर बढ