Posts

Showing posts from May, 2020

नोकरी शोधण्याच्या पद्धती..

Image
                  नोकरी शोधण्याच्या पद्धती. आज अनेक मुलांच्या नोकऱ्या कोरोना मूळे जात आहेत किंबहुना गेल्या असतील , आता अशा काळात आर्थिक परिस्थिती जवळपास सर्वांचे खालावली असणार आता नवीन नोकरी लवकर मिळावी यासाठी बरेच जण प्रयत्नशील असतील. आता अश्या वेळी काही जॉब पोर्टल वरून फसवणुकीचे प्रकार वाढायला सुरुवात होईल ,     तर आता अश्या आव्हानात्मक काळात नोकरी कशी शोधावी व फसवणुकीपासून कस सावधान व्हावं यासाठी हा लेख.. नोकरी शोधण्याच्या पद्धती . 1. सर्वात आधी आपण  नोकरी डॉट कॉम , वा इनडीड  यासारख्या संकेस्थळावर  प्रोफाईल तयार करावी. त्यात आपली बद्दलची नोकरी संदर्भातील माहिती अचुक भरायची, त्यानंतर दररोज सकाळी 8 - 10 ह्या वेळेत आपली प्रोफाइल अपडेट करावी , आता प्रोफाइल अपडेट करायची म्हणजे काल जो आपण आपला resume दिला आहे त्यालाच डिलीट करून पुन्हा तोच सांगितलेल्या वेळेत अपलोड करावा हे रोज करायचे आहे , आपल्या प्रोफाइल ची हेडलाईन् ही उत्तम असावी जेणेकरून HR लोकांना जे नेमक हवं ते शोधायला सोप्पं जाईल. 2. LinkedIn ह्या संकेस्थळावरही स्वतःची प्रोफाइल तयार करावी .   Link

कोरोना... दुबई , भारत आणि अस्वस्थता.

Image
        कोरोना ..... दुबई , भारत आणि अस्वस्थता...            सकाळी ७ वाजता उठायचं , थोडा व्यायाम करायचा नंतर मस्त फ्रेश व्हायचं.थोडा तयार होऊन नाश्ता झाल्यावर हक्काच्या कामासाठी बाहेर पडायचे इतका घाईघाईचा असला तरीही आवडीचा दिनक्रम सगळ्यांचा आयुष्याच्या एक मोलाचा भाग आहे. हे असं सगळ्यांचा आयुष्य ठरल्याप्रमाणे सुरू असताना अचानक कुठून तरी एक डोळ्याला न दिसणारा विषाणू येतो आणि आपल आयुष्य आपली धावपळ एकदमच थबकते.. आपण सगळे जगतमान्य लॉकडाउन मध्ये अटकतो.           आज  50 दिवस होतील , अख्ख जग Lockdown स्थितीत आहे जसजसे दिवस पुढे जात आहेत तसा सगळ्यांना कंटाळा यायला लागला पण आता फक्त कंटाळा नाही तर लोक अस्वस्थ व्हायला सुरू झाले. थोडक्यात संदीप खरे यांची मराठीत कव्वाली सारखी गत झाली अख्ख्या जगाची. " अगतिक झालो निष्प्रभ झालो ,                       तरीही केला तुझाच धावा , रोकठोक मज आज बोलू दे ,                       माणुसकीने एका देवा , जाब तुला रे कुणी पुसावा , जाब तुला रे कुणी पुसावा ."            आणी ही अस्वस्थता अगदी लहान शाळकरी मुलापासून ते महाकाय देशापर्यंत आहे.