गाव - बदलत बघतांना
गावं.. लहानपणी शहराची प्रचंड ओढ होती कारण तेव्हा शहर काय असतं ते कधी पाहिलंच नव्हतं , ऐकलं होतं फक्त शहरातील गावाकडे येणार्या नोकरदार मंडळींकडून तो त्यांचा रुबाब ,त्यांच्या शहराविषयीच्या कथा पण आज शहरात आल्यावर कळते गाव काय असत ते. गावात गेलेला वेळ हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव असतो त्याला मी कसा अपवाद असणार. गावाकडची प्रत्येक गोष्ट सांगावी वाटते त्या गावाकडच्या आठवणी असतातच आपल्यात कायम खास करून परदेशातून गावाकडे बघतांना खूप गोष्टी नव्याने वाटू लागतात. पण अचानक मला प्रश्न पडतो की लिहायचं तर गावा बाबतच का ? शहराबाबत का नाही ? मग हळूच लक्षात येतं बर्गर आणि पिझ्झा आपल्याला पचवण्याचा विषय होऊ शकला नाही तर सुचण्याचा कसा होऊ शकेल . गाव म्हटलं की पक्ष्यांच्या किलबिलाटात झाडेझुडपे खेळण्यासाठी भरपूर आणि मोकळी जागा हा विषय वेगळा परंतु गावातही आता पक्षांची जास्त वावर नाही मुलंही मोबाईलमध्ये गुंतलेले व शहरातच गावा पेक्षा जास्त झाडी आहेत असं वाटू लागलय. शहरातल्या लोकांना गाव म्हटलं म्हणजे नदी , सै